वेदांता डिविडेंड : Vedanta Dividend
Vedanta Dividend ।। vedanta resources ।। Vedanta Ltd. ।। Vedanta Financials ।। वेदांता डिविडेंड ।। Vedanta Dividend history,
मायनिंग क्षेत्रात काम करणारी वेदांता ही कंपनी गेल्या काही दिवसापासून तिने दिलेल्या डिविडेंड मुळे खूप चर्चेत आहे. वेदांता 2022 या आर्थिक वर्षात एकूण 45 रुपये डिविडेंड दिला आहे. 2022 चं कंपनीचं डिविडेंड यिल्ड 15.62 आहे आणि पेआऊट रेशिओ 0.30 आहे. तसेच 2023 या चालू आर्थिक वर्षातही वेदांताने दोन टप्प्यामध्ये 30.50 आणि 19.50 असा एकूण 51 रुपये डिविडेंड आता पर्यंत दिला आहे.
कंपनीने चालू वर्षात आणखी दोनदा 20-20 रुपये जरी डिविडेंड दिला तरी कंपनीचा 2023 चा एकूण डिविडेंड 70 ते 90 च्या दरम्यान राहू शकतो. वेदांता ही सर्वात जास्त डिविडेंड देणारी कंपनी बनली आहे. 2022 या अर्थिक वर्षात वेदान्ताने तब्बल 16740 कोटी रुपये आपल्या शेअरहोल्डर्स ना डिविडेंड म्हणून दिले आहेत. तर 2023 मध्ये Q1 आणि Q2 मध्ये कंपनीने तब्बल 18972 कोटी रुपये आपल्या शेअरहोल्डर्स ना डिविडेंड म्हणून दिले आहेत.
वेदांता लिमिटेड ची शेअर ची किंमत २८० वर खेळत असून वेदांता चा PE ratio 5.47 आहे. सेक्टर PE ratio 13.26 आहे.
वेदांता चा PB ratio 1.24 आहे. सेक्टर PB ratio 2.58 आहे. तसेच सेक्टर डिविडेंड यिल्ड 2.35 आहे.
वेदांताचा 2022 चा Debt to Equity ratio 0.47 आहे. वेदांताची जवळपास 100 % होल्डिंग प्लेजड आहे. म्हणजेच कंपनीवर कर्ज आहे.
वेदांता ची मागील 9 वर्षांची डिविडेंड ची हिस्ट्री : Vedanta Dividend history for last 9 years:-
वेदांता आर्थिक : Vedanta Financials:-
वेदांता कंपनीने 2023 या चालू आर्थिक वर्षात पहिल्या आणि दुसऱ्या तिमाही मिळून आतापर्यंत एकूण 79816 कोटी रुपयांची उलाढाल केली असून, 10220 कोटी रुपयांचा प्रॉफिट कमावला आहे.
वेदांता कंपनीने 2022 या आर्थिक वर्षात 135332 कोटी रुपयांची उलाढाल केली असून 2022 चं प्रॉफिट 18802 कोटी रुपये आहे. तसेच कंपनीचे 2022चे नेट मार्जिन 13.89% आहे.
ॲल्युमिनिअम : Aluminium :- वेदांता ही ॲल्युमिनिअमचं उत्पादन करणारी भारतातील सर्वात मोठी कंपनी असून भारतातील एकूण प्रायमरी ॲल्युमिनिअम उत्पादना पैकी 60 % वाटा हा वेदांताचा आहे. ॲल्युमिनिअम हे जगातील 3 नंबर चा सर्वात जास्त वापरला जाणारा धातू आहे.
झिंक, लीड आणि सिल्वर : Zinc, Lead & Silver :- वेदांता कंपनीचा हिंदुस्थान झिंक लिमिटेड कंपनीमध्ये मध्ये 64.9 % शेअर असून भारतातील एकूण झिंकच्या उत्पादनापैकी 80 % वाटा हिंदुस्थान झिंक लिमिटेड चा आहे. झिंक हा ४ थ्या क्रमांकाचा सर्वात जास्त वापरला जाणारा धातू आहे.
तसेच हिंदुस्थान झिंक लिमिटेड ही चांदीचे उत्पादन करणारी जगातील 6 व्या क्रमांकाची कंपनी आहे. 2022 या आर्थिक वर्षात हिंदुस्थान झिंक लिमिटेड ने टन चांदीचे उत्पादन केले.
ऑइल आणि नॅचरल गॅस : Oil and Natural Gas :-केयर्न ऑइल अँड गॅस ही कच्च्या तेलाचे उत्पादन करणारी भारतातील सर्वात मोठी कंपनी असून केयर्न ऑइल अँड गॅस मध्ये 58.8 % शेअर्स वेदांता लिमिटेड चे आहेत. 2020 सालच्या भारताच्या कच्च्या तेलाच्या एकूण उत्पादना पैकी 25 % हिस्सा हा केयर्न ऑइल अँड नॅचरल गॅस चा आहे.
स्टील : Steel :-2018 मध्ये वेदांता लिमिटेड चा ESL स्टील लिमिटेड चा 90 % स्टेक विकत घेतला आहे. ESL स्टील लिमिटेड ची वार्षिक स्टील उत्पादन क्षमता 15 लाख टन आहे. स्टील हा सर्वात जास्त वापरला जाणारा पहिल्या क्रमांकाचा धातू आहे.
तांबे : Copper :- स्टरलाईट कॉपर ही वेदांताचीच कंपनी असून स्टरलाईट कॉपर ही भारताची तांब्याची 36 % गरज पूर्ण करते.
वीज निर्मिती : Power :- तळवंडी साबो पॉवर लिमिटेड (TSPL) या पॉवर सेक्टर मधल्या कंपनीच मालकी वेदांता लिमिटेड कडे असून TSPL ही वीज तयार करणाऱ्या खाजगी क्षेत्रातल्या सर्वात मोठ्या कंपन्यांपैकी एका कंपनी आहे.
ही माहिती तुम्हाला आवडल्यास शेअर करायला विसरू नका.
धन्यवाद.
Vedanta Dividend।। vedanta resources।। Vedanta Ltd. ।। Vedanta Financials ।। वेदांता डिविडेंड ।। Vedanta Dividend history ।।
Share Market information in Marathi ।। Share Market basics in Marathi ।। Share Market in Marathi ।। Share Market information in Marathi pdf
Comments
Post a Comment