Share Market questions and answers in marathi
Frequently Asked Questions about Share Market in Marathi !
Share Market questions and answers in marathi ।। Share Market information in marathi ।। Share Market basics in marathi ।। Share market in marathi
१) सेक्टर म्हणजे काय?
एक सारखे प्रॉडक्ट बनवणाऱ्या, एकाच क्षेत्रात काम करणाऱ्या किंवा एकाच क्षेत्रात सेवा देणाऱ्या कंपन्यांच्या ग्रुप ला सेक्टर म्हणतात. एका सेक्टर मधील कंपन्या एकमेकांच्या प्रतिस्पर्धी असतात.
२) स्टॉक एक्सचेंज म्हणजे काय ? Stock Exchange mhanje ky ?
स्टॉक एक्सचेंज एक असे बाजार स्थळ आहे जिथे शेअर्स तसेच बॉण्ड्स आणि कमोडिटी ची खरेदी-विक्री होते.
३) भारतात कुठले स्टॉक एक्सचेंज आहेत ?
भारतात नॅशनल स्टॉक एक्सचेंज(NSE) आणि बॉम्बे स्टॉक एक्सचेंज(BSE) हे दोन स्टॉक एक्सचेंज आहेत ?
४) Stock Broker कोणाला म्हणतात ?
Stock Exchange member लाच Stock Broker म्हणतात. Stock Broker हा Stock Exchange आणि सामान्य गुंतवणूकदार यांच्यातील मध्यस्थाची भूमिका पार पाडतो.
५) ट्रेडिंग आणि गुंतवणुकीत काय फरक आहे ?
कमी कालावधी साठी शेअर्स विकत घेऊन विकले तर त्याला ट्रेडिंग म्हणतात ट्रेडिंग चा कालावधी १ दिवसापासून काही महिन्यांचा असू शकतो.
१ वर्ष पेक्षा अधिक काळासाठी शेअर्स विकत घेतले तर त्याला गुंतवणूक म्हणतात.
६) Intraday trading म्हणजे काय ?
एकाच दिवशी शेअर्स विकत घेऊन त्याच दिवशी विकतात त्याला Intraday Trading म्हणतात. म्हणजे एकदा शेअर्स घेतले कि त्याच दिवशी मार्केट बंद होण्याच्या आधी शेअर्स विकावे लागतात. नाही विकले तर मार्केट बंद होण्याच्या वेळी सर्व Intra day चे शेअर्स मार्केट प्राईस ला आपोआप विकले जातात.
७) Bull market आणि Bear market म्हणजे काय ?
शेअर्स खरेदी करणाऱ्यांची संख्या जास्त असते अशा वेळी मार्केट वाधरतं अशा वेळी मार्केट ला Bull market म्हणतात.
तसेच शेअर्स विकणाऱ्यांची संख्या जास्त असते अशा वेळी मार्केट घसरतं अशा वेळी मार्केट ला Bear market म्हणतात.
८) Volatility म्हणजे काय ?
कधी कधी गुंतवणूकदार किंवा ट्रेडर्स मोठ्या प्रमाणात शेअर्सची खरेदी-विक्री करतात अशा वेळी मार्केट वेगाने वर-खाली होत असतं याला Volatility म्हणतात. Volatility ची करणे काहीही असू शकतात जसे कि गव्हर्नमेंट पॉलिसी, कंपनी पॉलिसी, कंपनी परफॉर्मन्स
९) Trading मध्ये Leverage किंवा Margin म्हणजे काय ?
ट्रेडिंग करताना आपण आपल्याकडे असलेल्या पैशाच्या २ ते ५ पटींपर्यंत अधिक पैसे ब्रोकर कडून उधार घेऊ शकतो यालाच लिव्हरेज किंवा मार्जिन म्हणतात. म्हणजे ब्रोकर चे पैसे वापरून आपण २ते ५ पट अधिक शेअर्स विकत घेऊ शकतो. ब्रोकर कडून उधार घेतलेल्या पैशावर ब्रोकर १८ % पर्यंत व्याज आकारतो.
शेअर्स विकल्यानंतर ब्रोकर उधार पैसे आपल्या खात्यातून वजा करतो.
१०) Market Capitalization म्हणजे काय ?
Market Capitalization म्हणजे कंपनीच्या एकूण आऊटस्टँडिंग शेअर्स ची संख्या गुणिले शेअर्स ची मार्केट प्राईस. आऊटस्टँडिंग शेअर्स म्हणजे शेअरहोल्डर्स जवळ असलेले शेअर्स.
Market cap = total number of outstanding shares * shares market price
हेही वाचा फायनान्सियल स्टेटमेंट ।। Financial Statement
११) IPO म्हणजे काय ?
कंपनी जेव्हा पहिल्यांदा आपले शेअर्स लोकांना विकते तेव्हा त्याला IPO म्हणजे Initial Public Offering म्हणतात.
१२) Secondary Public Offering म्हणजे काय ?
कंपनी जेव्हा दुसऱ्यांदा आपले शेअर्स लोकांना विकते तेव्हा त्याला Secondary Public Offering म्हणतात.
१३) Share Market मध्ये volume कशाला म्हणतात ?
ठराविक काळात खरेदी-विक्री झालेल्या एकूण शेअर्स च्या संख्येला volume म्हणतात.
१४) FII म्हणजे काय ?
FII म्हणजे Foreign Institutional Investor. परदेशी वित्तीय संस्था ज्यांची देशातील शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक आहे. यात परदेशी म्युच्युअल फंडस्, परदेशी विमा कंपन्या ,परदेशी बँका येतात.
१५) DII म्हणजे काय ?
DII म्हणजे Domestic Institutional Investor. देशातील वित्तीय संस्था ज्यांची देशातील शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक आहे. यात देशातील म्युच्युअल फंडस्, देशातील विमा कंपन्या ,देशातील बँका येतात.
१६) Dividend म्हणजे काय ?
कंपनी आपल्या प्रॉफिट चा काही भाग गुंतवणूकदारांशी शेयर करते त्याला Dividend म्हणतात.
१७) Mutual Funds काय आहे ?
Mutual Funds या वित्तीय संस्था आहेत ज्या गुंतवणूकदारांकडून पैसे जमा करून शेअर मार्केट मध्ये इन्व्हेस्ट करतात आणि गुंतवणूकदारांना योग्य परतावा मिळवून देतात.
१८) SIP काय आहे ?
SIP म्हणजे Systematic Investment plan. यामध्ये आपण ठराविक अंतराने थोडे-थोडे पैसे Mutual Funds मध्ये गुंतवू शकतो.
१९) शेअर्स चे Dematerialization म्हणजे काय ?
गुंतवणूकदार आपल्याकडे कागदपत्रांच्या स्वरूपात असलेल्या भौतिक शेअर्स चे इलेक्ट्रॉनिक शेअर्स मध्ये रूपांतर करतो यालाच Dematerialization असे म्हणतात.
ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कंमेंट करून नक्की सांगा.
धन्यवाद.
Share Market questions and answers in marathi ।। Share Market information in marathi ।। Share Market basics in marathi ।। Share Market in marathi
Comments
Post a Comment