। Share market kasa kam karta? ani order che prakar। ।शेअर मार्केट कसं काम करतं ? आणि ऑर्डर चे प्रकार।
Share Market Marathi Mahiti ।। Share Market information in Marathi ।। Share Market basics in Marathi ।। Share Market in Marathi
मित्रहो या भागात आपण Share market कसं काम करतं हे जाणून घेऊ.
मागील भागात आपण पाहिलं कि कंपनी IPO च्या माध्यमातून आपले काही शेअर्स विकून आपल्या साठी लागणारा निधी उभा करते. हे शेअर्स बँका, विमा कंपन्या, सामान्य गुंतवणूकदार, इतर कंपन्या खरेदी करतात. हि सर्व शेअर्स ची खरेदी-विक्री Stock Exchange होते. Stock Exchange हे एक असे बाजारस्थळ आहे जिथे इलेकट्रोनिक आणि सॉफ्टवेअर तंत्रज्ञानाचा वापर करून सर्व खरेदी-विक्रीचे व्यवहार जुळवून आणले जातात. यामध्ये मध्ये शेअर्स बरोबर बॉण्ड्स आणि कमोडिटीचीहि खरेदी-विक्री होते. BSE(Bombay Stock Exchange) आणि NSE(National Stock Exchange) हे भारतातील दोन प्रमुख Stock Exchange असून सर्वात जास्त व्यवहार NSE Stock Exchange वर होतात.
जरी Stock Exchange सर्व व्यवहार होत असले तरी सामान्य गुंतवणूकदाराला थेट Stock Exchange वर व्यवहार करता येत नाही. कारण त्यासाठी Stock Exchange मेंबर असणं आवश्यक आहे Stock Exchange मेंबर लाच स्टॉक ब्रोकर्स म्हणतात. सामान्य गुंतवणूकदार स्टॉक ब्रोकर्स च्या माध्यमातून शेअर्स ची खरेदी-विक्री करू शकतात. थोडक्यात ब्रोकर्स गुंतवणूकदार आणि Stock Exchange यांच्यातील मध्यस्थाची भूमिका बजावतात. त्या बदल्यात ब्रोकर्स ब्रोकरेज फी आकारतात. सामान्य गुंतवणूकदाराला ट्रेडिंगसाठी ब्रोकर्सकडे अकाउंट उघडणे गरजेचे असते.
आता शेअर्स खरेदी विक्रीचे व्यवहार कसे चालतात ते बघू. त्यासाठी एक उदाहरण घेऊ. जसे कि समजा भाजी मंडईत विक्रेते बटाटे ३० रुपये किलो ने बटाटे विकत आहेत. पण ग्राहकाची अपेक्षा मात्र २५ रुपये प्रति किलोची आहे अशा वेळी ग्राहक विक्रेत्याशी वाटाघाटी सुरु करतात. अशा वेळी जर बटाटे ३० रुपये किलोने विकले जात नसतील तर ग्राहकाला बटाटे २५ रुपये किलो दराने मिळू शकतात. पण जर ग्राहक भरपूर असतील आणि ते जर ३० रुपये किलो किंवा त्यापेक्षा जास्त दराने खरेदी करण्यास तयार असतील तर विक्रेता भाव वाढवूही शकतो. म्हणजेच मागणी घटली तर भाव कमी होतात आणि मागणी वाढली तर भाव वाढतात.
Share market चं हि असंच आहे समजा एखाद्या कंपनीच्या शेअर्स ची मार्केट प्राईस १०० आहे. पण तुम्हाला ते शेअर्स ९५ रुपयाला खरेदी करायचे आहेत. जर हे शेअर्स १०० रुपयाला कुणी खरेदी करत नसेल तर तुम्हाला हे शेअर्स ९५ रुपयाला मिळू शकतात. पण जर खरेदीदार जास्त असतील आणि ते जर १०० रुपयाला किंवा त्यापेक्षा जास्त किमतीला शेअर्स खरेदी करायला तयार असतील तर मग मात्र तुम्हाला ते शेअर्स १०० पेक्षा कमी किमतीत मिळणार नाहीत.
शेअर्स ची खरेदी-विक्री करण्यासाठी सामान्य गुंतवणूकदाराला ब्रोकेरकडे ऑर्डर द्यावी लागते. त्यासाठी एखाद्या ब्रोकरकडे अकाउंट असणे गरजेचे असते. ही ऑर्डर तुम्ही कॉम्पुटर किंवा मोबाईलवरून ब्रोकर च्या अँपमधून तुम्ही अगदी सहज देऊ शकता. आता ऑर्डर चे प्रकार बघू.
ऑर्डर चे प्रकार।। Types of orders:-
१) लिमिट ऑर्डर: Limit order२) मार्केट ऑर्डर: Market order
३) स्टॉप लॉस ऑर्डर: Stop Loss order
४) ड्यूरेशन ऑर्डर : Duration order
२) मार्केट ऑर्डर :- जर शेअर तात्काळ चालू बाजारभावाला खरेदी करायचा असेल तर या ऑर्डर चा वापर केला जातो.
३) स्टॉप लॉस ऑर्डर:-समजा तुम्ही १०० रुपये किमतीचा एखादा शेअर खरेदी केला जर शेअर ची किंमत वाढली तर तुम्हाला फायदा होईल. पण जर किंमत कमी झाली तर तुम्हाला तोटा होऊ शकतो. ही रिस्क कमी करण्यासाठी तुम्ही स्टॉप लॉस ऑर्डर चा वापर करू शकता.
समजा तुम्ही ५ रुपयेच तोटा सहन करू शकत असाल तर तुम्ही ९५ रुपये किमतीवर स्टँप लॉस ऑर्डर देऊ शकता. जेणेकरून किंमत जर ९५ रुपया पर्यंत खाली आलीच तर शेअर विकला जाऊन होणारे जास्तीचे नुकसान थांबते. थोडक्यात रिस्क कमी करण्यासाठी या ऑर्डर चा वापर होतो.
४) ड्यूरेशन ऑर्डर:- या मध्ये तुम्ही ऑर्डर प्लेस होण्याचा कालावधी सेट करू शकता त्या कालावधीत ती ऑर्डर प्लेस झाली नाही तर ती ऑर्डर आपोआप रद्द होते.
मित्रहो तुम्हाला ही माहिती कशी वाटली कंमेंट करायला विसरू नका.
धन्यवाद.
हेही वाचा शेअर मार्केट म्हणजे काय? | Share market mhanje ky?
Share Market Marathi Mahiti ।। Share Market information in Marathi ।। Share Market basics in Marathi ।। Share Market in Marathi
Comments
Post a Comment