PE ratio in marathi || Debt to equity ratio In Marathi
PE ratio।। Debt to equity ratio ।। Fundamental analysis ।।Invesment ।। प्राईस टू अर्निंग रेशिओ ।। पीइ रेशिओ ।। अर्निंग पर शेअर ।।डेबीट तो इक्विटी रेशिओ ।। फंडामेंटल ऍनालिसिस ।। इन्व्हेस्टमेंट
नमस्कार आज आपण या भागात बेसिक फंडामेंटल ऍनालिसिस (basic fundamental analysis) साठी कुठल्या महत्वाच्या गोष्टी माहित असणे गरजेचे आहे ते बघू जर तुम्ही शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत आहात तर काही बेसिक गोष्टी तुम्हाला माहित असणे गरजेचे आहे.
Share Market Marathi Mahiti ।। Share Market information in Marathi ।। Share Market basics in Marathi ।। Share Market in Marathi
१) PE ratio काय आहे? : What is PE ratio
?
२) डेबीट टू इक्वीटी रेशिओ काय आहे? : what is debt to equity ratio?
१) प्राईस टू अर्निंग रेशिओ :Price to earning ratio : PE ratio :-
PE ratio हा फंडामेंटल ऍनालिसिस मधील महत्वाचा घटक आहे. यामध्ये शेअर ची किंमत प्रति शेअर अर्निंग च्या तुलनेत किती आहे हे पहिले जाते.
PE ratio जेवढा कमी असेल तेवढा तो शेअर गुंतवणुकीसाठी योग्य समजला जातो.
कंपनीचा PE ratio सेक्टर P/E रेशिओ पेक्षा ( एकसारखे प्रॉडक्ट बनवणाऱ्या इतर कंपन्यांचा सरासरी PE ratio) कमी असेल तर शेअर गुंतवणुकीसाठी योग्य समजला जातो.
PE ratio पुढील प्रमाणे मिळवतात,
PE ratio = शेअर ची मार्केट प्राईस / अर्निंग पर शेअर
त्याआधी अर्निंग पर शेअर काय आहे ते पाहू,
अर्निंग पर शेअर : Earning per share (EPS):-
कंपनी प्रति शेअर किती नफा कमावते यालाच Earning per share म्हणतात.
अर्निंग पर शेअर =कंपनीचे नेट प्रॉफिट / कंपनीच्या एकूण शेअर्स ची संख्या
उदाहरणार्थ :- ITC Ltd. चे २०२१ चे नेट प्रॉफिट १३०३१६८००००० रुपये असून टोटल शेअर्स ची संख्या १२३०८८४४२३१ इतकी आहे.
मग अर्निंग पर शेअर =१३०३१६८००००० / १२३०८८४४२३१
=१०.५८७२४९१
=१०.५९ रुपये.
म्हणजे ITC ची २०२१ ची अर्निंग पर शेअर १०.५९ रुपये इतकी आहे.
२०२१ साली ITC च्या शेअर्स ची मार्केट प्राईस २०० ते २५६ च्या दरम्यान होती. शेअर्स ची किंमत दिवसाला बदलत असते. तसा अर्निंग पर शेअर आणि प्राईस तो अर्निंग चा रेशिओ पण बदलतो.
मग आता ITC चा २५६ पर शेअर च्या किमतीला PE ratio किती येतो ते पाहू,
PE ratio =२५६/१०.५९
PE ratio =२४.१८
म्हणजे २५६ च्या किमतीवर ITC Ltd चा PE ratio २४.१८ आहे.
कंपनीच्या नेट प्रॉफिट च्या तुलनेत शेअर ची मार्केट प्राईस वाढली. तर PE ratio वाढतो. P/PE ratio
जेवढा कमी तेवढा तो शेअर गुंतवणुकीसाठी साठी चांगला मानला जातो. सर्वसाधारणपणे २० च्या आतील PE ratio असणारा शेअर हा गुंतवणुकीसाठी चांगला मानला जातो.
३० च्या वरील PE ratio हा हायPE ratio मानला जातो आणि गुंतवणुकीसाठी साठी अशा शेअर चा विचार केला जात नाही.
पण सर्व गुंतवणूकदार याचा विचार करतातच असे नाही. काही गुंतवणूकदार कमी कालावधीसाठी शेअर्स खरेदी करतात व किंमत थोडीशी वाढली कि शेअर्स विकतात त्यामुळे शेअर्स ची किंमत वाढत जाते. पण कंपनीचं अर्निंग त्या तुलनेत वाढत नाही परिणामी प्राईस आणि अर्निंग पर शेअर मधली तफावत वाढत जाते आणि PE ratio वाढतो.
PE ratio हाय असलेल्या काही कंपन्या:- MRF Ltd, Ceat Ltd, Maruti Suzuki India Ltd.
गुंतवणुकीसाठी PE ratio कमी असलेले शेअर्स उत्तम जरी असले तरी इतरही काही गोष्टींचा विचार करणे गरजेचे आहे. जसे कि कंपनीवरील कर्ज, कंपनीची आर्थिक प्रगती, कंपनीचे प्रॉफिट मार्जिन, कंपनीचे आगामी प्रकल्प आणि ध्येय.
२) डेबीट टू इक्वीटी रेशिओ : debt to equity ratio:-
debt to equity ratio हा देखील फंडामेंटल ऍनालिसिस मधील एक महत्वाचा घटक आहे. यामध्ये कंपनीच्या इक्विटी च्या तुलनेत कंपनीवर किती कर्ज आहे याची तुलना केली जाते. डेबीट टू इक्विटी रेशिओ जेवढा कमी तेवढा तो शेअर गुंतवणुकीसाठी योग्य समजला जातो.
डेबीट टू इक्विटी रेशिओ पुढीलप्रमाणे मिळवतात,
डेबीट टू इक्विटी रेशिओ= नॉन-करंट लायाबिलिटीस / शेअर होल्डर्स इक्विटी
महिंद्रा अँड महिंद्रा ली. ची २०२२ ची नॉन-करंट लायाबिलिटी(डेबीट) जवळपास ६७३५.५६ कोटी आहे. यामध्ये आणि टोटल शेअर होल्डर्स इक्विटी ३८९६०.९५ कोटी एवढी आहे.
मग,
डेबीट टू इक्विटी रेशिओ= ६७३५. ५६ / ३८९६०. ९५
=०.१७२८७९
=०. १७
म्हणजे महिंद्रा अँड महिंद्रा चा २०२२ चा डेबीट टू इक्विटी रेशिओ ०.१७ आहे.
डेबीट टू इक्विटी रेशिओ ० ते १.५ च्या दरम्यान असेल तर असा शेअर गुंतवणुकूसाठी योग्य मानला जातो.
हाय डेबीट टू इक्विटी रेशिओ असलेल्या काही कंपन्या:-
१)वोडाफोन आयडिया ली. : - वोडाफोन आयडिया चा २०२० चा डेबीट टू इक्विटी रेशिओ १०.७१ होता. म्हणजे शेअर होल्डर्स च्या इक्विटी च्या १० पट कर्ज कंपनीवर २०२० साली होतं. २०२१ साली वोडाफोन आयडिया चा डेबीट टू इक्विटी रेशिओ -४.१८ आणि २०२२ साली -३. १ होता.
२)सुझलॉन एनर्जी लि. :-सुझलॉन चा डेबीट टू इक्विटी रेशिओ २०२०, २०२१, २०२२ साली अनुक्रमे -०. ८६, -१.११, -१.०९ होता.
वरील दोन्ही उदाहरणांमध्ये २०२१ आणि २०२२ साली डेबीट टू इक्विटी रेशिओ कमी जरी दिसत असला तरी तो मायनस मध्ये आहे. कंपनीवरील एकूण कर्ज मालमत्तेपेक्षा जास्त झाल्याने इक्विटी मायनस मध्ये गेली आहे. असे शेअर्स गुंतवणुकीच्या दृष्टीने धोकादायक असतात.
तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कंमेंट करून नक्की सांगा.
धन्यवाद.
Share Market Marathi Mahiti ।। Share Market information in Marathi ।। Share Market basics in Marathi ।। Share Market in Marathi
Comments
Post a Comment