Financial Statement In Marathi
Financial Statement मधील काही महत्वाच्या गोष्टी आणि Financial Statement कंपन्या कशा पद्धतीने सादर करतात हे अगदी सोप्या भाषेत आपण या भागात जाणून घेऊ. कृपया त्यासाठी हा ब्लॉग संपूर्ण वाचा.
Share Market Marathi Mahiti ।। Share Market information in Marathi ।। Share Market basics in Marathi ।। Share Market in Marathi
आपणा सर्वांना माहित आहे की आपलं आर्थिक वर्ष मार्च ते मार्च गणलं जातं. कंपन्या आपलं financial statement म्हणजेच आर्थिक अहवाल ३ महिन्यातून एकदा जाहीर करतात आणि वर्षातून ४ वेळा जाहीर करतात. या तिमाही ला Quarter म्हणतात म्हणजे एका वर्षात एकूण ४ Quarter येतात. ते पुढील प्रमाणे,
एप्रिल ते जून - First Quarter (Q1)
जुलै ते सप्टेंबर - Second Quarter (Q2)
ऑक्टोबर ते डिसेंबर - Third Quarter (Q3)
जानेवारी ते मार्च - Fourth Quarter (Q4)
Share Market संदर्भात अमुक कंपनीला Q1 मध्ये एव्हढे प्रॉफिट झाले. Q2 मध्ये एवढा सेल झाला किंवा लॉस झाला अशा बातम्या तुम्ही ऐकल्या असतील. यामध्ये एप्रिल ते जून च्या Financial Statement ला Q1 म्हणजेच Quarter-1 चं Financial Statement म्हणतात.
तुम्ही असाही ऐकलं किंवा वाचलं असेल कि अमुक कंपनीला FY22Q1 मध्ये अमुक कंपनीला एवढा प्रॉफिट किंवा एवढा लॉस झाला. FY22Q चा अर्थ Financial Year 2022 Quarter असा होतो.
Variable Cost:-
Variable Cost मध्ये प्रामुख्याने Man power cost, Electricity bill, Fuel Cost, Raw material इ. गोष्टींचा समावेश होतो. Variable Cost कंपनीच्या उत्पादन आणि सेल नुसार बदलत असते.
EBITDA:-
EBITDA म्हणजे Earning Before Interest Tax Depreciation And Amortization. Revenue म्हणजेच उलाढाली मधून Variable Cost वजा केल्यानंतर खाली उरते त्याला EBITDA म्हणतात.
Depreciation आणि Amortization म्हणजे काय?
Depreciation:- कंपनी आपल्या टँजेबल अससेट्स म्हणजे स्थावर मालमत्तेचं जीवनमान ठरवते आणि वेळेनुसार आपल्या टँजेबल अससेट्स ची किंमत वजा करते. याला Depreciation म्हणतात.
उदाहरणार्थ:- समजा कंपनी ने एखादे १० लाखाचे मशीन घेतले असेल. आणि त्या मशीन चं सर्वसाधारण उपयोगी आयुष्य १० वर्ष ठरवले असेल तर कंपनी दरवर्षी १ लाख या प्रमाणे मशीन ची किंमत आपल्या EBITDA मधून वजा करते. याला Depreciation याला म्हणतात.
Amortization:- कंपनीला पेटंट, कॉपीराइट, टॅक्सी परवाना आणि ट्रेडमार्क इ. साठी पैसे मोजावे लागतात. हा खर्च कंपनी दरवर्षी EBITDA मधून वजा करते. याला Amortization म्हणतात.
उदाहरणार्थ:-समजा कंपनीने एखादा ट्रेडमार्क १० लाखाला १० वर्षासाठी विकत घेतला असेल तर कंपनी दरवर्षी १ लाख याप्रमाणे ट्रेडमार्क ची किंमत EBITDA मधून वजा करते. याला Amortization म्हणतात.
अर्थात कंपनीचे Depreciation आणि Amortization चे कॅल्क्युलेशन्स वेगळे आहेत उदाहरण फक्त समजण्यासाठी दिले आहेत.
EBITDA मधून Depreciation आणि Amortization वजा केल्यानंतर खाली EBIT शिल्लक राहते. EBIT लाच Operating profit असेही म्हणतात.
कंपनीवर दीर्घ काळासाठी काही कर्ज असेल तर कंपनी व्याजाची रक्कम आपल्या EBIT मधून दर वर्षी वजा करते.
EBITDA मधून Interest, Depreciation आणि Amortization वजा केल्यानंतर खाली शिल्लक राहते त्याला EBT म्हणजे Earning Before Tax किंवा PBT म्हणजे Profit Before Tax म्हणतात.
कंपनीला २५ ते ३० % टॅक्स भरावा लागतो. TAX ची रक्कम कंपनी आपल्या EBT मधून वजा करते.
टॅक्स EBT मधून वजा केल्यानंतर खाली शिल्लक राहते त्याला PAT म्हणजे Profit after tax किंवा Net Profit म्हणतात.
उदा. :- समजा XYZ कंपनीची इक्विटी १००रु. आहे. कंपनीची एका आर्थिक वर्षाची उलाढाल १००रु. असून कंपनीवर १०रु चे कर्ज आहे.
म्हणजे XYZ कंपनीला २६.६ रु. नेट प्रॉफिट झालं.
तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कंमेंट करून नक्की सांगा.
धन्यवाद.
Share Market Marathi Mahiti ।। Share Market information in Marathi ।। Share Market basics in Marathi ।। Share Market in Marathi
Comments
Post a Comment